काश्मीरमध्ये ‘या’ चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना घडली दुर्दैवी घटना, तरुणीचे निधन
दाक्षिणात्य अभिनेता नानीच्या 'हिट 3' चित्रपटाचे काश्मीरमध्ये शूटिंग सुरू असताना दुर्दैवी घटना घडली. क्रू मेंबर कृष्णा केआर हिचा छातीत संसर्ग आणि हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. कृष्णा केरळची होती आणि तिच्यावर पेरुम्बावूर येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. 'हिट 3' हा 'हिट' फ्रँचायझीचा तिसरा भाग असून नानी मुख्य भूमिकेत आहे.