“‘छावा’मुळे औरंगजेबाबद्दलचा राग बाहेर येतोय, पण…”, फडणवीसांनी केला विधानसभेत उल्लेख!
नागपूरमधील दंगलीच्या मुद्द्यावर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. सोमवारी झालेल्या दंगलीत ३३ पोलीस जखमी झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत दिली. त्यांनी 'छावा' चित्रपटाचा उल्लेख करत औरंगजेबाबद्दलचा संताप व्यक्त केला. फडणवीसांनी कायदा-सुव्यवस्था राखण्याचं महत्त्व सांगितलं आणि दंगा करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला.