दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजयविरोधात तक्रार दाखल, मुस्लिमांचा अपमान केल्याचा आरोप
सध्या रमजानचा महिना सुरू आहे. यानिमित्ताने काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजयने ७ मार्चला चेन्नईत इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. यासाठी अभिनेत्याने एक दिवसाचा रोजा ठेवला होता. पांढरे कपडे, डोक्यावर टोपी या पेहरावात थलपती विजय नमाज पठण करताना दिसला होता. या इफ्तार पार्टीमधील विजयचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. पण, याच चेन्नईतील इफ्तार पार्टीवरून थलपती विजयविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.