Ed Sheeran ने शिल्पा रावसह गायलं Jr NTR व जान्हवी कपूरचं रोमँटिक गाणं, पाहा व्हिडीओ
हॉलीवूडचा सुप्रसिद्ध गायक एडवर्ड क्रिस्टोफर शीरन (Ed Sheeran)चा सध्या भारत दौरा सुरू आहे. त्यामुळे तो कधी रिक्षामधून फिरताना दिसत आहे, तर कधी डोक्याची मालिश करून घेताना दिसत आहे. अलीकडेच Ed Sheeran बंगळुरू येथील एका चर्चाच्या बाहेर गाताना दिसला. पण तितक्यात बंगळुरूच्या पोलिसांनी कारवाई केली. थेट स्पीकरच्या वायर काढल्या. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. पण, सध्या Ed Sheeran आणि लोकप्रिय गायिका शिल्पा रावच्या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.