मुंबईतील दाम्पत्यानं माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलीलाच फसवलं; तरुणीला घातला ४ कोटींचा गंडा!
उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची मुलगी आरुषी निशंक यांनी मुंबईतील मिनी फिल्म्स प्रा. लि. कंपनीवर फसवणुकीचा आरोप केला आहे. चित्रपटात भूमिका देण्याच्या नावाखाली चार कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. देहरादून पोलीस ठाण्यात बागला दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिनी फिल्म्सने हे आरोप फेटाळले असून प्रकरण दिवाणी स्वरुपाचे असल्याचे म्हटले आहे.