क्लबमधील भेट ते लग्न! प्रसिद्ध अभिनेत्रीने बिझनेसमनबरोबर थाटला संसार, फोटो आले समोर!
मागील काही महिन्यांत अनेक सेलिब्रिटींनी लग्न केले. आता अभिनेत्री पार्वती वेणुगोपाल नायरने बिझनेसमन आश्रित अशोकशी तिरुवनमीयूर येथे पारंपारिक दक्षिणात्य पद्धतीने लग्न केले. दोघांनी काही वर्षे डेट केल्यानंतर ३ फेब्रुवारीला इंगेजमेंट केली आणि १० फेब्रुवारीला लग्न केले. पार्वतीने सोनेरी साडी तर आश्रितने कुर्ता आणि धोतर परिधान केले होते. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.