वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने निवडलं वेगळं करिअर, अभिनय सोडून झाली IAS
यूपीएससी ही अत्यंत कठीण परीक्षा असून, लाखो विद्यार्थी दरवर्षी या परीक्षेला बसतात. अभिनेत्री एचएस कीर्तना, कन्नड चित्रपटसृष्टीत यशस्वी असतानाही, वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयएएस अधिकारी बनली. २०११ मध्ये कर्नाटका प्रशासकीय सेवा परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर, २०१९ मध्ये सहाव्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास झाली. सध्या ती मांड्या जिल्ह्यात असिस्टंट कमिश्नर म्हणून कार्यरत आहे.