अभिनेत्री कस्तुरीला २९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी, ‘ते’ वक्तव्य पडलं महागात
दाक्षिणात्य अभिनेत्री कस्तुरी शंकर तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहे. तिने तेलुगू भाषिक लोकांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती, ज्यामुळे तिला अटक करण्यात आली. चेन्नई पोलिसांनी तिला हैदराबादमधून अटक करून चेन्नई न्यायालयात हजर केले. तिला २९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कस्तुरीने माफी मागितली असली तरी तिच्याविरुद्ध तक्रारी दाखल झाल्या होत्या.