फ्लॅटमध्ये आढळला प्रसिद्ध एन्फ्लुएन्सरचा मृतदेह, सोशल मीडियावर आहेत लाखो फॉलोअर्स
सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर आणि आरजे सिमरन सिंह हिचा मृतदेह गुरुग्राममधील फ्लॅटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. २५ वर्षीय सिमरनच्या निधनाने तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. तिचे इन्स्टाग्रामवर ६.८३ लाख फॉलोअर्स आहेत. सिमरनने आपल्या करिअरची सुरुवात जम्मूमधून केली होती आणि ती 'जम्मू की धडकन' म्हणून ओळखली जायची. पोलिसांनी आत्महत्येचा संशय व्यक्त केला असून पुढील तपास सुरू आहे.