ऑस्कर विजेत्या हॉलिवूड अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू, पत्नीचाही मृतदेह आढळला
हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता जीन हॅकमन (९५) आणि त्यांची पत्नी बेट्सी (६३) यांचे मृतदेह त्यांच्या मेक्सिकोतील घरात आढळले. त्यांच्या पाळीव श्वानाचाही मृतदेह सापडला. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस तपास करत आहेत. जीन हॅकमन हे ऑस्कर विजेते अभिनेते होते आणि त्यांनी २००४ मध्ये निवृत्ती घेतली होती. बेट्सी क्लासिकल पियानिस्ट होत्या.