“फायर नहीं वाईल्ड फायर…” म्हणणारा ‘पुष्पा’ जेव्हा भावूक होतो..
हैदराबादमध्ये पुष्पा २ चित्रपटाच्या प्रीमियरला अल्लू अर्जुन उपस्थित राहिल्यानंतर चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी आणि एमआयएम आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी अल्लू अर्जुनवर गंभीर आरोप केले. अल्लू अर्जुनने पत्रकार परिषदेत हे आरोप फेटाळले आणि भावूक होऊन रडला. त्याने या घटनेला दुर्दैवी अपघात म्हटले. पुष्पा २ सिनेमा हजार कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला आहे.