Jaat vs Good Bad Ugly: दोन्ही सिनेमांच्या कमाईत मोठी घट, वाचा दुसऱ्या दिवसाचे कलेक्शन
सनी देओलच्या 'जाट' चित्रपटाला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला, परंतु दुसऱ्या दिवशी कलेक्शनमध्ये घट झाली. पहिल्या दिवशी ११.६ कोटी रुपये कमावले, तर दुसऱ्या दिवशी ७ कोटी रुपये. अजित कुमारच्या 'गुड बॅड अग्ली' चित्रपटालाही पहिल्या दिवशी ३०.९ कोटींची कमाई झाली, परंतु दुसऱ्या दिवशी १३.५० कोटींवर घसरली. दोन्ही चित्रपटांच्या कलेक्शनमध्ये वीकेंडला वाढ होण्याची शक्यता आहे.