“हल्लेखोर प्रचंड आक्रमक होता, पण त्याने…”, सैफवरील हल्ल्यानंतर करीनाची प्रतिक्रिया
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी मध्यरात्री चाकूहल्ला झाला. चोराने घरात शिरून हल्ला केला आणि पसार झाला. सैफला गंभीर जखमा झाल्या असून तो लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहे. करिना कपूरने पोलिसांना दिलेल्या जबाबात दागिने सुरक्षित असल्याचे सांगितले. या घटनेमुळे करिना घाबरली असून तिची बहीण करिश्माने तिला खार येथील घरी नेले आहे.