शास्त्रीय गायक संदीप नारायण जेव्हा ‘कानडा राजा पंढरीचा’ गातात!
जयपूर येथे ३० जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत जयपूर साहित्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात ४७ देशांचे प्रतिनिधी, ३१ नोबेल आणि पुलित्झर पुरस्कार विजेते लेखक सहभागी झाले आहेत. संदीप नारायण यांच्या 'कानडा राजा पंढरीचा' गाण्याने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. हे गाणं गदिमांनी लिहिलं असून, १९७० च्या 'झाला महार पंढरीनाथ' चित्रपटातील आहे.