“स्त्रिया लहान कपडे घालून नाचायला…”, प्रसिद्ध अभिनेत्रीने ३० व्या वर्षी ग्लॅमरविश्व सोडले
प्रयागराज महाकुंभमेळ्यात अभिनेत्री इशिका तनेजाने संन्यास घेतला आहे. 'इंदू सरकार' फेम इशिका तनेजाने ग्लॅमरविश्वाला अलविदा करून सनातन धर्माचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. तिने द्वारका-शारदा पीठचे शंकराचार्य सदानंद सरस्वती यांच्याकडून गुरू दीक्षा घेतली आहे. इशिका म्हणते की, आयुष्यात सुख व शांती महत्त्वाची आहे. ती आता सनातन धर्माचा प्रचार करत आहे.