Mohanlal addresses media regarding Hema Committee report
1 / 31

मॉलीवूड लैंगिक शोषण प्रकरण: अभिनेते मोहनलाल यांचं मोठं विधान; “अनेक लोक यात..”

मनोरंजन August 31, 2024

मल्याळम सिनेसृष्टीतील महिलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणावर हेमा समितीच्या अहवालानंतर मोहनलाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अहवालाचे स्वागत केले आणि दोषींना शिक्षा होण्याची मागणी केली. मोहनलाल यांनी नैतिकतेच्या आधारावर अम्माच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांनी सिनेसृष्टीतील १०-१२ लोकांच्या गटात आपला समावेश नसल्याचे स्पष्ट केले. अम्मा सर्व समस्यांचे निराकरण करू शकत नसल्याचेही त्यांनी मान्य केले.

Swipe up for next shorts
Poonam Gupta
2 / 31

RBI च्या डेप्युटी गर्व्हनरपदी पूनम गुप्ता यांची नियुक्ती; जागतिक बँकेत २० वर्षांचा अनुभव!

जागतिक बँकेच्या माजी अर्थतज्ज्ञ पूनम गुप्ता यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या पुढील तीन वर्षे या पदावर राहतील. गुप्ता सध्या NCAERच्या महासंचालक आहेत आणि त्यांनी IMF, जागतिक बँक, NIPFP, ICRIER यांसारख्या संस्थांमध्ये काम केले आहे. त्यांनी मेरीलँड विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएचडी केली आहे.

Swipe up for next shorts
Success story of arpita thube gave upsc became IAS after 3 failures
3 / 31

जिद्द असावी तर अशी! एकदा दोनदा नाही तर तब्बल तीनवेळा हरली; चौथ्या प्रयत्नात कशी झाली IAS

Success Story of Arpita Thube: केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) नागरी सेवा परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार नागरी सेवेत सामील होण्याचे स्वप्न पाहतात. पण, या कठीण प्रवासात काही मोजकेच लोक यशस्वी होतात. बरेच लोक काही कारणास्तव हार मानतात. तर काहीजण त्यांच्या अढळ समर्पणाने आणि कठोर परिश्रमाने एक आदर्श निर्माण करतात. याचच एक उदाहरण म्हणजे आयएएस अधिकारी अर्पिता थुबे.

Swipe up for next shorts
Ajit Pawar Speech in Beed Said This Thing
4 / 31

अजित पवारांचं वक्तव्य; “चुलत्याच्या कृपेने आमचं बरं चाललं आहे, आजचे पुढारी…”

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर असताना युवकांना मोलाचे सल्ले दिले. त्यांनी पुढाऱ्यांच्या पाया पडण्याऐवजी आई-बाप आणि गुरुंच्या पाया पडण्याचा सल्ला दिला. सोशल मीडियाचा योग्य वापर करण्याचे महत्त्व सांगितले आणि चुकीच्या गोष्टींना विरोध केला. विविध गँग्सवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. सर्वधर्म समभाव जपण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले तसंच चुलत्याच्या कृपेने आमचं बरं चाललंय असंही ते म्हणाले.

goat milk ghee
5 / 31

“लॅक्टोज फ्री शेळीच्या दुधाचे तूप खा!” आहारतज्ज्ञांनी सांगितले फायदे

"गाय किंवा म्हशीचे तूप विसरून जा, कारण आता नवीन प्रकारे शेळीच्या दुधापासून तूप बनवले जात आहे आणि ते पोषणाच्या बाबतीत एक शक्तिशाली स्त्रोत म्हणून ओळखले जाते. हे तूप बी१२, ई आणि डीसारखे जीवनसत्त्वे आणि ओमेगा-३ आणि ओमेगा-६ फॅटी अॅसिडने समृद्ध आहे," असे आहारतज्ज्ञ आणि प्रमाणित मधुमेह शिक्षक डॉ. अर्चना बत्रा यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.

Donald Trump
6 / 31

Dirty 15 : डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्काचा कोणत्या देशांवर सर्वाधिक परिणाम होणार?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिलपासून विदेशी उत्पादनांवर परस्पर आयातशुल्क लादण्याची घोषणा केली आहे. हे शुल्क अमेरिकन वस्तूंवर जास्त शुल्क लादणाऱ्या किंवा अन्याय्य व्यापार धोरणांचे पालन करणाऱ्या देशांना लक्ष्य करेल. "डर्टी १५" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशांमध्ये चीन, युरोपियन युनियन, मेक्सिको, भारत, जपान, दक्षिण कोरिया यांचा समावेश आहे. या देशांना नवीन शुल्काचा सर्वात मोठा परिणाम सहन करावा लागेल.

Waqf Amendment Bill
7 / 31

वक्फ विधेयकात कोणत्या सुधारणा केलेल्या आहेत? त्यावरून वाद का निर्माण झाला?

वक्फ (सुधारणा) विधेयक २०२५ आज लोकसभेत सादर होणार आहे. मोदी सरकारने विधेयकावर चर्चा करण्यासाठी आठ तासांची वेळ निश्चित केली आहे. संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी वक्फ मालमत्तांच्या व्यवस्थापनात सुधारणा आवश्यक असल्याचे सांगितले. वक्फ म्हणजे इस्लाम धर्मीयांनी धार्मिक कार्यासाठी दिलेली जमीन. वक्फ बोर्डाकडे ९.४ लाख एकर मालमत्ता आहे. विधेयकामुळे वक्फच्या व्याख्येत बदल होणार आहे.

girl running with books viral video
8 / 31

…अन् पुस्तकं घेऊन धावली चिमुकली; बुलडोझर कारवाईचा Video व्हायरल; कोर्टानंही घेतली दखल!

उत्तर प्रदेशमध्ये बेकायदा बांधकामांवर बुलडोझर कारवाई चर्चेत आहे. आंबेडकर नगरमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाईदरम्यान ८ वर्षांची अनन्या यादव झोपडीतून पुस्तकं घेऊन धावताना दिसली. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून सर्वोच्च न्यायालयानेही याची दखल घेतली आहे. प्रशासनाने कोणतंही निवासी बांधकाम पाडले नसल्याचे स्पष्ट केले आहे. अनन्याच्या कुटुंबाला अनेक नेते भेटत आहेत.

Tejasswi Prakash and Gaurav Khanna became the first two finalists of celebrity masterchef
9 / 31

‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’च्या अंतिम फेरीत पोहोचले ‘हे’ दोन स्पर्धक

‘सोनी टीव्ही’ वाहिनीवरील ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. निक्की तांबोळी, अर्चना गौतम, तेजस्वी प्रकाश, गौरव खन्ना, राजीव अडातिया, फैजल शेख या सहाजणांमधून कोण ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’चा विजयी होणार? हे पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सध्या उपांत्य फेरी ( Semi Finale ) सुरू आहे. यामध्ये स्पर्धकांना कठीण टास्कचा सामना करावा लागत आहे. हे कठीण टास्क पूर्ण करत दोन स्पर्धक आता अंतिम फेरीपर्यंत पोहोचले आहेत. तर निक्की तांबोळीसह चार जणांवर एलिमिनेशनची टांगती तलवार आहे.

waqf amendment bill in loksabha
10 / 31

वक्फ विधेयकाला तेलुगु देसमचा पाठिंबा, अट फक्त एकच; बिगर मुस्लीम सदस्याबाबत चंद्राबाबूंची..

वक्फ सुधारणा विधेयक २०२४ लोकसभेत चर्चेसाठी मांडण्यात आलं आहे. भारतीय जनता पक्षासह एनडीएतील तेलुगु देसम पक्ष आणि जदयूची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. चंद्राबाबू नायडूंनी वक्फ बोर्डात बिगर मुस्लीम सदस्यांच्या समावेशाची अट घालून पाठिंबा दिला आहे. विधेयकातील इतर सुधारणांना तेलुगु देसम पक्षाचा पाठिंबा आहे. वक्फ मालमत्तांच्या संरक्षणासाठी पक्ष बांधील असल्याचं नायडूंनी स्पष्ट केलं आहे.

Buldhana Accident today
11 / 31

बुलढाण्यात तीन वाहनांचा विचित्र अपघात; ५ जणांचा मृत्यू, २४ जण जखमी

बुलढाणा जिल्ह्यात शेगाव-खामगाव महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. बोलेरो, एसटी बस आणि खासगी बसच्या या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून २४ जण जखमी झाले आहेत. अपघात पहाटे साडेपाचच्या सुमारास घडला. जखमींवर खामगाव शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले.

Aishwarya Rai Bachchan and Abhishek Bachchan dance on Kajra Re song with daughter aaradhya video goes viral on social media
12 / 31

चुलत भावाच्या लग्नात ऐश्वर्या-अभिषेकचा ‘कजरा रे’ गाण्यावर जबरदस्त डान्स; पाहा व्हिडीओ

गेल्या वर्षभरापासून ऐश्वर्या राय-बच्चन आणि आभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहेत. दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा थांबायचं काही नावचं घेत नाहीये. शिवाय यावर ऐश्वर्या आणि अभिषेकने मौन धारण केलं आहे. दोघं आपल्या कृतीमधून एकत्र असल्याचं सतत दाखवून देत आहेत. अलीकडेच दोघं ऐश्वर्याच्या चुलत भावाच्या लग्नात एकत्र दिसले. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याच लग्न समारंभातील आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये ऐश्वर्या व अभिषेक एकत्र डान्स करताना दिसत आहेत.

gangrape in telangana
13 / 31

धक्कादायक! मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या महिलेवर ७ जणांचा सामुहिक बलात्कार; इलेक्ट्रिशियन…

हैदराबादमध्ये मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या एका महिलेवर सात जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्री उरकोंडापेटा गावातील मंदिराजवळ हा प्रकार घडला. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून पीडितांना योग्य उपचार मिळावेत व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, असे निर्देश दिले आहेत.

Money Heist Style Robbery
14 / 31

SBI चा बेकरी मालकाला कर्ज देण्यास नकार, ‘मनी हाईस्ट’ स्टाईल दरोडा टाकत सोनं लुटलं

कर्नाटकातील दावणगिरी जिल्ह्यात एसबीआय बँकेत पाच महिन्यांपूर्वी १३ कोटींचं सोनं चोरीला गेलं. विजय कुमार या बेकरी मालकाने कर्ज नाकारल्यामुळे मनी हाईस्ट स्टाईलने दरोडा टाकला. पोलिसांनी विजयसह सहा जणांना अटक केली. विजयने मनी हाईस्ट वेबसीरीज पाहून दरोड्याचा कट आखला होता. दरोड्याच्या दिवशी त्यांनी बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरे आणि डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डरही पळवले.

e bike taxi in maharashtra
15 / 31

महाराष्ट्रात ई-बाईक टॅक्सीला परवानगी; भाडं किती? कधी सुरू होणार? वाचा काय म्हणाले मंत्री…

महाराष्ट्रात ई-बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होईल आणि कमी दरात प्रवास करता येईल. १५ किमी अंतराची मर्यादा ठेवण्यात आली असून, ५० बाईक एकत्र घेणाऱ्या संस्थांना परवानगी दिली जाईल. महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष नियमावली तयार करण्यात आली आहे. ई-बाईक टॅक्सीमुळे राज्यात २० हजार रोजगार निर्माण होतील.

Kunal Kamra Latest Post
16 / 31

कुणाल कामराची नवी पोस्ट चर्चेत; “लोकशाही पद्धतीने कलाकाराची हत्या…”

प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक गाणं रचलं, ज्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले. त्यानंतर कामराच्या शोच्या ठिकाणी तोडफोड झाली आणि तक्रारी दाखल झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कारवाईचा इशारा दिला. ठाकरे गटाने कामराला पाठिंबा दिला. कामराने एक पोस्ट लिहून कलाकारांवरील दडपशाहीवर भाष्य केलं.

yogi adityanath interview
17 / 31

Video:”धार्मिक शिस्त हिंदूंकडून शिका”,योगींची रस्त्यावर नमाज पढण्याच्या मुद्द्यावर भूमिका!

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ईदच्या दिवशी रस्त्यावर नमाज पढण्यास मनाई करण्याच्या आदेशांचं समर्थन केलं आहे. त्यांनी म्हटलं की, रस्ते चालण्यासाठी असतात आणि लोकांनी हिंदूंकडून शिस्त शिकावी. मेरठमध्ये प्रशासनाने नमाज पढण्यास मनाई केली होती आणि कायदेशीर कारवाईचा इशारा दिला होता. योगी आदित्यनाथ यांनी नमाज पढण्यासाठी इदगाह किंवा मशीद योग्य ठिकाणं असल्याचं सांगितलं.

Gujrat News
18 / 31

गुजरातमधील बनासकांठा येथील फटाका फॅक्ट्रीत स्फोट, पाच जण ठार

गुजरातच्या बनासकांठा येथील फटाका फॅक्ट्रीत स्फोट होऊन भीषण आग लागली. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून, अनेक कर्मचारी अडकले आहेत. जिल्हाधिकारी मिहिर पटेल यांनी सांगितले की, सकाळी ही घटना घडली आणि अग्निशमन विभागाने तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले. सध्या मदत आणि बचावकार्य सुरु आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Aahana Srishti success story
19 / 31

UPSC साठी परीक्षा देताना प्लॅन बी ठरला महत्त्वाचा! वाचा टॉपर अहाना सृष्टीचा प्रवास

करिअर April 1, 2025

Success Story Of Aahana Srishti : दिल्लीच्या अहाना सृष्टीने २०२४ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या भारतीय आर्थिक सेवा (IES) परीक्षेत ऑल इंडिया रँक ३ मिळवली आहे. तिने तिच्या प्रवासाबद्दल लिंक्डइनवर पोस्ट शेअर केली आहे. सुरुवातीला विषय समजण्यासाठी परीक्षा दिली होती आणि यशस्वी न झाल्यास एक प्लॅन बी सुद्धा तयार ठेवला होता. तिने आई, मैत्रिणी आणि देवाचे आभार मानले आहेत आणि इच्छुकांसाठी तयारीच्या टिप्स ब्लॉगवर शेअर केल्या आहेत.

Controversy About Marathi
20 / 31

“मराठी गया तेल लगाने, तुम…”; मुंबईत एल अँड टीच्या सुरक्षा रक्षकाची मुजोरी

मुंबई April 1, 2025

मुंबईतील पवईमध्ये 'एल अँड टी' कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने "मराठी गया तेल लगाने!" असे म्हणत मराठी भाषेचा अपमान केला. यामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला कानाखाली लगावली आणि माफी मागायला लावली. मनसैनिकांनी त्याच्यावर दबाव टाकून मराठी शिकेन अशी शपथ घ्यायला लावली.तसेच, सुपरवायझरला इशारा दिला की मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही.

uttarakhand name change
21 / 31

‘औरंगजेबपूर’ झालं ‘शिवाजी नगर’, उत्तराखंडमधील १५ ठिकाणांची नावं बदलली!

उत्तराखंडमधील सत्ताधारी पुष्कर सिंह धामी सरकारने राज्यातील १५ ठिकाणांची नावं बदलण्याचा निर्णय घेतला आहे. हरिद्वार, डेहराडून, नैनीताल व उधम सिंह नगर या जिल्ह्यांतील ठिकाणांचा समावेश आहे. लोकभावना, भारतीय संस्कृती, ऐतिहासिक वारसा यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. शिवाजी नगर व ज्योतिबा फुले नगर यासारख्या नावांचा समावेश आहे. भाजपाने या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Bigg Boss OTT 2 Fame Manisha Rani purchased her first home in Mumbai
22 / 31

‘बिग बॉस ओटीटी २’ फेम बिहारच्या मनीषा रानीचं स्वप्न पूर्ण; मुंबईत घेतलं हक्काचं घर

ओटीटी April 1, 2025

‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या पर्वातून घराघरात पोहोचलेल्या मनीषा रानीने आपल्या अनोख्या अंदाजाने हिंदी इंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘बिग बॉस ओटीटी’नंतर मनीषा ‘झलक दिखला जा’च्या ११ व्या पर्वात पाहायला मिळाली. तिनं आपल्या जबरदस्त डान्सनं ‘झलक दिखला जा’चं ११ वं पर्व जिकलं. या दोन लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोनंतर ती ‘हिप हॉप इंडिया’च्या दुसऱ्या पर्वात दिसत आहे. अशा लोकप्रिय बिहारच्या मनीषा रानीचं एक स्वप्न पूर्ण झालं आहे. मुंबईत तिनं स्वतःचं हक्काचं आलिशान घर खरेदी केलं आहे.

imran khan nobel nomination
23 / 31

शांततेच्या नोबेलसाठी इम्रान खान यांच्या नावाची शिफारस; पाकिस्तानात लोकशाहीसाठी मोठं काम…

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना शांततेसाठी नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस नॉर्वेमधील पाकिस्तान वर्ल्ड अलायन्सने केली आहे. त्यांनी पाकिस्तानमधील लोकशाही वृद्धिंगत करण्यासाठी मोठं काम केल्याचा दावा केला आहे. २०१९ मध्येही त्यांची शिफारस झाली होती, परंतु त्यांनी ती नाकारली होती. सध्या इम्रान खान विविध गुन्ह्यांसाठी रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात कैदेत आहेत.

What Devendra Fadnavis Said?
24 / 31

“औरंगजेबाची कबर हटवता येणार नाही, पण…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

फेब्रुवारी महिन्यात छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर औरंगजेबाच्या कबरीबाबत वाद निर्माण झाला. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी कबर उखडण्याची मागणी केली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती हटवता येणार नाही असे स्पष्ट केले. राज ठाकरे यांनी कबरीवर फलक लावून मराठ्यांनी औरंगजेबाला इथे गाडले हे सांगण्याची भूमिका घेतली. भारतीय पुरातत्व खात्याने कबरीला संरक्षण दिले आहे.

How to improve Husband Wife Relationship
25 / 31

Husband Wife Relationship कामस्वास्थ्य: बायकोने विचारलं, ‘वादात खूश व्हायचंय की, रात्री?’

वादामुळे तुम्ही मुद्दा जिंकालही, पण त्यातील जहालपणामुळे तुम्ही त्या व्यक्तीची आपुलकी गमवाल. एका बायकोने नवऱ्याच्या अशा नेहमीच्या हमरीतुमरीच्या सवयीला कंटाळून शेवटी त्याला एकदा विचारले, ‘तुला आत्ता वादात खूश व्हायचंय की रात्री?’

Provident Fund
26 / 31

PF धारकांसाठी महत्त्वाची बातमी, ऑटो सेटलमेंटची मर्यादा वाढवणार

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) आपल्या ७.५ कोटी सदस्यांच्या 'इज ऑफ लिव्हिंग'चा विस्तार करण्यासाठी अॅडव्हान्स क्लेम (एएसएसी) ची ऑटो सेटलमेंट मर्यादा १ लाख रुपयांवरून ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर झाला. यामुळे पीएफ धारकांना शिक्षण, विवाह, गृहनिर्माण आणि वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत फायदा होईल. ऑटो-मोड क्लेम तीन दिवसांत प्रक्रिया होतात आणि ९५ टक्के क्लेम स्वयंचलित केले जातात.

success story of anshu kumari bihar board topper wants to become doctor to fight cancer
27 / 31

मी डॉक्टरच होणार! आईला कर्करोगाशी झुंजताना पाहून टॉपर मुलीचा निर्णय

करिअर March 31, 2025

Success Story of Anshu Kumari: अंशु कुमारीने बिहार बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला आहे. ती १६ वर्षांची आहे. तिने परीक्षेत पहिला क्रमांक मिळवून राज्याचे नाव उंचावले आहे. अंशु कुमारी म्हणाली की तिला कर्करोगाच्या रुग्णांना मदत करायची आहे. तिच्या आईलाही कर्करोग आहे. अंशु कुमारी पश्चिम चंपारणच्या नौटन ब्लॉकमधील भारतीय इंटर कॉलेज गहिरी येथे शिक्षण घेते. तिची इच्छा व्यक्त करताना अंशूने सांगितले की तिला डॉक्टर (ऑन्कोलॉजिस्ट) व्हायचे आहे.

Walnut or Akhrot Health Benefits| Aliv Seeds Health Benefits in Marathi
28 / 31

Walnut Benefits ‘हा’ आहे, विविध प्रकारच्या गाठींवरचा रामबाण उपाय; तर बाळंतिणींसाठी…

अक्रोड किंवा अखरोटाचे आरोग्यदायी फायदे

सुकामेवा आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अक्रोड मेंदूच्या आरोग्यासाठी उपयुक्त असून बौद्धिक थकवा, झोपेच्या समस्या, वजन वाढवणे, हृद्रोग, रक्तदोष, वातरक्त यावर गुणकारी आहे. अक्रोडाचे तेल रेचक म्हणून वापरता येते. मासिक पाळीच्या तक्रारी, जंत, पित्त यावरही अक्रोड उपयुक्त आहे. केसांच्या आरोग्यासाठी अक्रोड खाणे फायदेशीर आहे.

Tejashri Pradhan Share Special Post For Honaar Soon Mee Hyaa Gharchi fame asha shelar
29 / 31

तेजश्रीचं ‘होणार सून…’ मालिकेतील आईबरोबर अजूनही आहे घट्ट नातं, फोटो शेअर करत म्हणाली…

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘होणार सून मी ह्या घरची’ ही गाजलेल्या मालिकांपैकी एक अशी मालिका. या मालिकेनं अडीच वर्षं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. शशांक केतकर, तेजश्री प्रधान, रोहिणी हट्टंगडी, सुप्रिया पाठारे, लीना भागवत अशी तगडी कलाकार मंडळी ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेत पाहायला मिळाली. ही मालिका अनेक जण आजही तितक्याच आवडीनं पाहतात. या मालिकेत झळकलेल्या मायलेकी जान्हवी व शशिकला यांचं नातं अजूनही तसंच घट्ट आहे. तेजश्री प्रधाननं नुकतीच शशिकला म्हणजेच अभिनेत्री आशा शेलार यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

TB transmitted through kissing or sexual contact know about tuberculosis Disease
30 / 31

चुंबन किंवा लैंगिक संपर्काद्वारे क्षयरोगाचा संसर्ग होऊ शकतो का? तज्ज्ञ सांगतात…

TB Transmitted Through Kissing or Sexual Contact: क्षयरोग (टीबी) हा एक अत्यंत संसर्गजन्य जीवाणू आहे, जो प्रामुख्याने फुफ्फुसांवर परिणाम करतो. परंतु, शरीराच्या इतर भागांमध्येदेखील तो पसरू शकतो. जेव्हा एखादी संक्रमित व्यक्ती खोकते, शिंकते किंवा बोलते तेव्हा क्षयरोग हवेतील थेंबांद्वारे पसरतो हे सर्वज्ञात आहे.

bhaiyyaji joshi on aurangzeb tomb
31 / 31

संघाकडून पुन्हा एकदा औरंगजेब मुद्द्यावर भाष्य; भैय्याजी जोशींचं परखड मत, म्हणाले…

गेल्या महिन्याभरापासून औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेला वाद अद्याप शमला नाही. बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेकडून कबर हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैय्याजी जोशी यांनी हा मुद्दा अनावश्यक असल्याचे सांगितले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही कबरीवरची सजावट काढून तिथे औरंगजेबाच्या इतिहासाचा बोर्ड लावण्याची मागणी केली.