जालन्यातल्या नाट्यगृहाची दुरवस्था पाहून स्पृहा जोशी संतापली, म्हणाली, “आपण सगळ्यांनी…”
काही दिवसांपूर्वी अभिनेते शरद पोंक्षे यांनी बीडमधल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामधील भयंकर अनुभव सांगितला. अस्वच्छता आणि बाथरुमची भयाण अवस्था पाहून शरद पोंक्षेंनी खंत व्यक्त करत निषेध नोंदवला. याचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर आता अभिनेत्री स्पृहा जोशीने जालन्यातल्या नाट्यगृहाची दुरवस्था पाहून संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.