“पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा!”, विकी कौशलने मराठीतून सादर केली कुसुमाग्रजांची कविता
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज ठाकरेंनी मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांची उपस्थिती होती. विकी कौशलने कुसुमाग्रजांची "कणा" कविता सादर केली. विकीने मराठीतून कविता सादर करताना नर्व्हस असल्याचे सांगितले. राज ठाकरे आणि मनसेने आयोजित केलेला हा कार्यक्रम मराठी भाषेच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण ठरला.