तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता…; मराठी कलाकारांच्या घरी आले गणपती बाप्पा!
मराठी कलाकारांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन मोठ्या उत्साहात झालं आहे. स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, रुपाली भोसले, शशांक केतकर अशा असंख्य सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. 'ठरलं तर मग' फेम अमित भानुशालीने ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचं स्वागत केलं आहे.