“आज जर तुम्ही असता तर…”, अत्याचाराच्या प्रकरणावर आनंद दिघेंची आठवण काढत अभिनेत्याची पोस्ट
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात लैंगिक अत्याचाराच्या घटनांमुळे संतापाची लाट पसरली आहे. बदलापूरमधील शाळेत घडलेल्या घटनेनंतर नागरिकांनी आंदोलन केले. पुणे, अंबरनाथ, मुंबई, कोल्हापूरमध्येही अशा घटना समोर आल्या आहेत. अभिनेता जयेश चव्हाणने सोशल मीडियावर आनंद दिघेंची आठवण काढत संताप व्यक्त केला आहे.