पंतप्रधान मोदींनाही ‘छावा’ची भुरळ; अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील भाषणात केला उल्लेख
राजधानी दिल्लीत पार पडलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी मराठी भाषेच्या इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आणि महापुरुषांचा उल्लेख केला. 'छावा' चित्रपटाचा उल्लेख करताच उपस्थितांनी जयघोष केला. मोदींनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचे भाग्य असल्याचे सांगितले.