प्राजक्ता माळीनं सुरेश धसांबाबत मांडली सडेतोड भूमिका; “ज्या कुत्सितपणे विधान केलंत…
बीडचे आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीबाबत केलेल्या विधानामुळे मोठी चर्चा झाली आहे. प्राजक्ता माळीनं मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. धस यांच्या निराधार विधानामुळे तिला मनस्ताप सहन करावा लागला असून त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली. तिने महिला आयोगाकडे तक्रार केली असून, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना ठोस कारवाई करण्याची विनंती केली आहे.