“महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे शोभत नाही”, प्राजक्ता माळीचा सुरेश धसांवर संताप!
गेल्या दोन दिवसांपासून बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. या प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नाव घेतल्याने वाद निर्माण झाला आहे. प्राजक्ता माळीनं त्यांच्या विधानाचा निषेध करत, महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा आरोप केला आहे. तिने सुरेश धस यांना जाब विचारत, कलाकारांना राजकारणात का ओढता, असा प्रश्न उपस्थित केला आहे.