अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या कमाईत ७१ टक्क्यांनी वाढ
Pushpa 2 Box Office Collection Day 10: अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना अभिनीत ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ५ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला हाउसफुल्ल प्रतिसाद मिळत आहे. ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटाला प्रदर्शित होऊन आता १० दिवस झाले आहेत. तरीही बॉक्स ऑफिसवर प्रत्येक दिवशी कोट्यावधींची कमाई सुकुमारचा चित्रपट करत आहे. कमाईबरोबरच ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपट नवनवीन रेकॉर्ड आपल्या नावे करत आहे.