Pushpa 2 ने जगभरात २६ दिवसांत किती कमाई केली? जाणून घ्या आकडेवारी
पुष्पा 2: द रुल हा अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल यांच्या मुख्य भूमिका असलेला चित्रपट ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. चौथ्या आठवड्यातही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. २६ व्या दिवशी ६.६५ कोटी रुपयांचे कलेक्शन झाले. एकूण कमाई ११६३.६५ कोटी रुपये झाली आहे. तेलुगू भाषेत ३२६.३१ कोटी, हिंदीत ७५८.६५ कोटी, तामिळमध्ये ५६.९५ कोटी, मल्याळममध्ये १४.१२ कोटी आणि कन्नडमध्ये ७.६२ कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाने जगभरात १७६० कोटी रुपयांची कमाई केली आहे.