रणवीर अलाहाबादिया, समय रैनासह पाच जणांविरोधात ‘या’ राज्यात अश्लीलता पसरवल्याचा गुन्हा
प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादिया याच्या अडचणी वाढल्या आहेत. आसाममध्ये रणवीर, आशिष चंचलानी, जसप्रीत सिंह, अपूर्वा मखीजा, समय रैना यांच्याविरोधात अश्लीलता पसरवल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ही माहिती दिली. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने युट्यूबला आक्षेपार्ह कंटेंट हटवण्याची नोटीस पाठवली आहे.