रणवीरपाठोपाठ तन्मय भट, राखी सावंत, उर्फी जावेदसह ‘यांना’ पोलिसांनी बजावलं समन्स
रणवीर अलाहबादिया यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी तन्मय भट, राखी सावंत, उर्फी जावेद, सिद्धांत चतुर्वेदी, दीपक कलाल यांना समन्स बजावले आहेत. रणवीरने एका शोमध्ये वादग्रस्त प्रश्न विचारल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. समय रैनाच्या शोमध्ये सहभागी असलेल्या अनेक सेलिब्रिटींवरही कारवाई करण्यात आली आहे. सन्मिती पांडे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी ३० जणांविरोधात तक्रारी नोंदवल्या आहेत.