रश्मिका मंदानाची अल्लू अर्जुनच्या अटकेबाबत पहिली प्रतिक्रिया; म्हणाली…
तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनला 'पुष्पा 2' च्या प्रिमियरमध्ये चेंगराचेंगरीत एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आली होती. तेलंगणा हायकोर्टाने त्याला जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणावर 'पुष्पा 2' मधील मुख्य अभिनेत्री रश्मिका मंदानाने प्रतिक्रिया दिली आहे. तिने एक्सवर पोस्ट करून म्हटले की, "घडलेली घटना दुर्दैवी आहे, मात्र एकाच व्यक्तीवर सर्व दोषारोप होत आहेत, हे पाहून वाईट वाटत आहे."