सैफवर केल्या दोन शस्त्रक्रिया; अभिनेत्याच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली सखोल माहिती!
अभिनेता सैफ अली खानवर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर त्याला मध्यरात्री लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा मुलगा इब्राहिम अली खान याने त्याला रुग्णालयात नेले. सैफवर न्युरोसर्जरी आणि प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. डॉक्टर नितीन डांगे यांनी सांगितले की, सैफची प्रकृती स्थिर असून सुधारणा होत आहे. त्याला दोन खोल आणि दोन किरकोळ जखमा आहेत. चाकूचं टोक मणक्यातून काढण्यात आलं आहे.