“हाच हिंदू जातीला लागलेला शाप…”, ‘छावा’नंतर सुरू असलेल्या वादावर शरद पोंक्षेंची भाष्य
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटाची सध्या चहुबाजूने चर्चा सुरू आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘छावा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे, त्यामुळे त्याच्या कामाचं कौतुक होतं आहे. पण दुसऱ्याबाजूला ‘छावा’ चित्रपटानंतर सोशल मीडियावर अनेक वाद निर्माण झाले आहेत. याच वादाविषयी अभिनेते शरद पोंक्षे यांनी परखड मत मांडलं आहे.