Video: एसएस राजामौली यांचा पत्नी रमासह भन्नाट डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
SS Rajamouli Dance Video: भारतातील सर्वश्रेष्ठ दिग्दर्शकांपैकी एक म्हणजे एसएस राजामौली. दिग्दर्शनाबरोबरच ते पटकथा लेखक सुद्धा आहेत. ‘मगधीरा’, ‘बाहुबली’ आणि ‘आरआरआर’ यांसारखे ब्लॉकबस्टर चित्रपट करून राजामौली यांनी भारतीय प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ते अनेकांसाठी प्रेरणा आहेत. सध्या एसएस राजामौली एका डान्स व्हिडीओमुळे खूप चर्चेत आले आहेत. त्यांचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.