“आपली प्रेमकथा रामायणाच्या तोडीची”, जॅकलीन फर्नांडीसला सुकेश चंद्रशेखरचं तुरुंगातून पत्र
तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या ठग सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला पत्र लिहून त्यांच्या प्रेमकथेची तुलना रामायणाशी केली आहे. सुकेशने जॅकलिनच्या २०० चाहत्यांना महिंद्रा थार रॉक्स कार आणि आयफोन १६ प्रो भेट देण्याचे आश्वासन दिले होते. त्याने जॅकलिनला ५२ लाखांचा घोडा आणि ९ लाखांची पर्शियन मांजर भेट दिली होती. सुकेशवर २०० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.