“या अशा ऑनलाईन मजकुराबाबत काहीतरी…”, सुप्रीम कोर्टानं दिले सेन्सॉरचे संकेत; केंद्राला…
गेल्या काही दिवसांपासून रणवीर अलाहाबादिया प्रकरणाची जोरदार चर्चा आहे. 'इंडियाज गॉट लेटंट' शोमध्ये केलेल्या अश्लील टिप्पणीवरून वाद निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने रणवीरला अटकेपासून संरक्षण दिलं, पण त्याच्या विधानांवर कठोर शब्दांत सुनावलं. न्यायालयाने ऑनलाईन अश्लील मजकुरावर निर्बंधांचे सूतोवाच केले आहेत. केंद्र सरकारने यावर भूमिका स्पष्ट करावी, असंही न्यायालयाने नमूद केलं.