गुणरत्न सदावर्तेंची सलमान खानच्या शोमध्ये एन्ट्री, ‘बिग बॉस’च्या घरात राहणार गाढवाबरोबर!
Bigg Boss 18 : सलमान खानचा बहुचर्चित आणि बहुप्रीतिक्षित शो ‘बिग बॉस १८’ आता अवघ्या काही तासांत सुरू होणार आहे. सध्या ॲड. गुणरत्न सदावर्तेंचा प्रोमो चांगलाच चर्चेत आला आहे. या प्रोमोमध्ये “हम आते हैं डाकू की खानदान से” म्हणत गुणरत्न सदावर्ते एन्ट्री करताना दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला सलमान खानला हसू अनावर झाल्याचं पाहायला मिळत आहे.