Bigg Boss 18 Confirmed 6 Contestants On Salman Khan's Show watch list
1 / 30

सलमानच्या बहुचर्चित ‘बिग बॉस’साठी सहा स्पर्धकांवर शिक्कामोर्तब, ‘हा’ मराठी चेहरा झळकणार

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वानंतर हिंदीतील 'बिग बॉस'चं १८वं पर्व ६ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. सलमान खानच्या प्रोमोमधून शोच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली. या पर्वात निया शर्मा, शोएब इब्राहिम, धीरज धूपर, नायरा बनर्जी, शिल्पा शिरोडकर, चाहत पांडे ही सहा स्पर्धक निश्चित झाले आहेत. यामध्ये एक मराठी चेहरा झळकणार आहे.

Swipe up for next shorts
Surya transit in libra
2 / 30

पैसाच पैसा! सूर्याच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात येणार यश आणि भौतिक सुख

सूर्याचे तूळ राशीत प्रवेश: हिंदू पंचांगानुसार शारदीय नवरात्री ३ ते ११ ऑक्टोबर दरम्यान असेल. सूर्य १७ ऑक्टोबरला तूळ राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे काही राशींना विशेष लाभ होईल. मेष राशीच्या व्यक्तींना मानसन्मान, वर्चस्व आणि आर्थिक स्थिरता मिळेल. कर्क राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये यश, अडथळे दूर होतील आणि आईबरोबरचे नाते घट्ट होईल. धनु राशीच्या व्यक्तींना भाग्याची साथ, उत्पन्नाचे नवे मार्ग आणि आर्थिक लाभ मिळतील.

Swipe up for next shorts
Bigg Boss Marathi 5 Winner
3 / 30

सूरज चव्हाण, अंकिता नव्हे तर ‘हा’ सदस्य असणार Bigg Boss Marathi 5 चा विजेता?

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा ग्रँड फिनाले ६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. यंदाचे पर्व ७० दिवसांत संपणार असून, विजेता कोण असणार याबाबत एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोनुसार, वर्षा उसगांवकर, पंढरीनाथ कांबळे, धनंजय पोवार एलिमिनेट होतील. निक्की तांबोळी चौथी रनर-अप, जान्हवी तिसरी रनर-अप, सूरज तिसऱ्या क्रमांकावर, आणि अभिजीत सावंत विजेता ठरेल.

Swipe up for next shorts
Bigg Boss Marathi Season 5 Abhijeet sawant mimicry of nikki tamboli video viral
4 / 30

अभिजीत सावंतने निक्की तांबोळीची केली जबरदस्त नक्कल, व्हिडीओ पाहून तुम्हाला होईल हसू अनावर

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा समारोप ६ ऑक्टोबरला होणार आहे. सध्या नववा आठवडा सुरू असून, आठ स्पर्धक उरले आहेत. या आठवड्यात सर्व स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. अशातच अभिजीत सावंतचा निक्कीची नक्कल करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काहींना हा व्हिडीओ मजेशीर वाटला, तर काहींनी टीका केली आहे.

Who is Mohsin Akhtar Mir Urmila Matondkar Divorce
5 / 30

Urmila Matondkar Divorce: कोण आहे मोहसीन अख्तर मीर, काय करतो? जाणून घ्या

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि तिचा पती मोहसीन अख्तर मीर ८ वर्षांच्या संसारानंतर विभक्त होणार आहेत. उर्मिलाने चार महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. मोहसीन काश्मीरचा असून, तो अभिनेता होण्यासाठी मुंबईत आला होता. त्याने काही चित्रपटांमध्ये काम केले पण यश मिळाले नाही. सध्या तो फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राबरोबर काम करतो. उर्मिला आणि मोहसीन यांचा घटस्फोट परस्पर सहमतीने होत नसल्याचे वृत्त आहे.

Urmila Matondkar files for divorce from husband Mohsin Akhtar Mir
6 / 30

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने पती मोहसीन अख्तर मीरपासून घटस्फोटासाठी केला अर्ज

मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. उर्मिला पती मोहसीन अख्तर मीरपासून घटस्फोट घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. उर्मिलाने आठ वर्षांपूर्वी काश्मिरी व्यावसायिक व मॉडेल असलेल्या मोहसीनशी आंतरधर्मीय लग्न केलं. आता दोघांच्याही नात्यात दुरावा आला आहे, असे वृत्त आहे.

Chhaya Kadam first post after Laapataa Ladies goes to Oscars 2025
7 / 30

“माझ्या वाट्याला ‘लापता लेडीज’च्या…”, चित्रपट ‘ऑस्कर’ला गेल्यावर छाया कदम यांची पोस्ट

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री छाया कदम यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. 'कान फिल्म फेस्टिव्हल २०२४'मध्ये त्यांच्या 'ऑल वी इमॅजिन ॲज लाइट' चित्रपटाला पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्यांचा 'लापता लेडीज' चित्रपट 'ऑस्कर' २०२५ साठी भारताकडून निवडला गेला आहे. या चित्रपटात छाया कदम यांनी मंजू माईची भूमिका साकारली होती. 'लापता लेडीज' चित्रपट 'ऑस्कर'ला गेल्यानिमित्ताने नुकतीच छाया कदम यांनी पोस्ट शेअर केली आहे.

Tanuj Virwani-Tanya Jacob blessed with baby girl
8 / 30

दिग्गज बॉलीवूड अभिनेत्री झाली आजी, सूनेने लेकीला दिला जन्म

बॉलीवूड अभिनेता तनुज विरवानी आणि त्याची पत्नी तान्या जेकब यांना मुलगी झाली आहे. तनुजने इन्स्टाग्रामवर ही आनंदाची बातमी शेअर केली. अभिनेत्री रती अग्निहोत्री आता आजी झाल्या आहेत. तनुज आणि तान्याने २५ डिसेंबर २०२३ रोजी लोणावळ्यात लग्न केले होते. तनुजने 'वन नाइट स्टँड', 'पुरानी जीन्स', 'योद्धा', 'कोड एम' यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Sunita Willams Returns to earth
9 / 30

सुनिता विल्यम्स यांना पृथ्वीवर परत आणण्याकरता ‘हे’ दोन अंतराळवीर करणार मदत!

नासामधील भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकावर (आयएसएस) अडकले आहेत. त्यांच्या यानात बिघाड झाल्याने परतीचा प्रवास लांबला आहे. त्यांना पृथ्वीवर आणण्यासाठी निक हेग आणि अलेक्झांडर गोर्बुनोव्ह यांच्या नेतृत्वाखालील स्पेस एक्स क्रू ९ मोहिमेचे प्रयत्न सुरू आहेत. हेग आणि गोर्बुनोव्ह तांत्रिक समस्यांचे निराकरण करून सुनीता आणि विल्मोर यांना सुरक्षित परत आणण्यासाठी सज्ज आहेत.

Google Trending Personal Loans in Marathi
10 / 30

पर्सनल लोनच्या मागणीत वाढ! गुगल ट्रेंड काय सांगतोय? कोणत्या बँका देतात स्वस्तात कर्ज?

Personal Loans : देशात सणासुदीच्या हंगामात कर्जाच्या मागणीत प्रचंड वाढ होत असते. हल्ली लोकं विविध गोष्टी खरेदी करण्यासाठी लोनचा पर्याय निवडताना दिसतात. मोबाइल, घरातील लहान-मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपासून अनेक गोष्टी लोनवर खरेदी करतात. इतकंच नाही तर आता अनेक ऑनलाइन वेबसाइटवर महागडे कपडेही इएमआयवर खरेदी करण्याचा ऑप्शन दिला जातो. यांसारख्या अनेक कारणांमुळे आता गूगल ट्रेंड्सवरही पसर्नल लोन कीवर्ड ट्रेंड होताना दिसतोय.

Aseem Sarode on Badlapur Case
11 / 30

“पीडितेच्या पालकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न”, असीम सरोदेंचा मोठा दावा

बदलापूर लैंगिक शोषणप्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे पोलिस चकमकीत मृत्यू पावल्यानंतर वाद निर्माण झाले आहेत. विरोधकांच्या मते, न्यायाच्या चौकटीत शिक्षा व्हायला हवी होती, तर सरकारच्या मते, हा पीडितेला मिळालेला न्याय आहे. ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी एन्काऊंटरला खून म्हटले आहे आणि पालकांवर दबाव आणल्याचा आरोप केला आहे. न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचेही त्यांनी सांगितले.

spy cam in delhi
12 / 30

तरुणीच्या बाथरूमच्या बल्बमध्ये छुपा कॅमेरा; घरमालकाच्या मुलाकडे २ लॅपटॉपमध्ये सापडले Video

दिल्लीमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या एका तरुणीच्या भाड्याच्या घरात तिच्या बेडरूम व बाथरूमच्या बल्बमध्ये स्पाय कॅमेरा आढळल्याने खळबळ उडाली आहे. घरमालकाच्या ३० वर्षीय मुलाने, करनने, हे कॅमेरे बसवले होते. तरुणीच्या अनुपस्थितीत चावी घेऊन करनने हे कॅमेरे बसवले. पोलिसांनी करनला ताब्यात घेतले असून त्याच्या लॅपटॉपमध्ये रेकॉर्ड केलेले व्हिडीओ सापडले आहेत.

Amitabh bachchan Jaya Bachchan
13 / 30

बिग बींच्या अफेअर्सबद्दल बोलण्याचे निमंत्रण आल्यावर त्यांचे सासरे म्हणालेले…

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचे लग्न १९७३ साली झाले. त्यांच्या लग्नानंतर जया यांच्या वडिल, प्रतिष्ठित पत्रकार तरुण कुमार भादुरी यांच्या आयुष्यात मोठे बदल झाले. त्यांनी १९८९ मध्ये 'इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया'साठी लेख लिहून या बदलांची माहिती दिली. लोक त्यांना अमिताभ यांचे सासरे म्हणून ओळखू लागले. अनेक कार्यक्रमांसाठी निमंत्रणं येऊ लागली. तरुण कुमार भादुरी यांनी सांगितले की, हे सर्व त्यांच्या कर्तृत्वामुळे नव्हे तर अमिताभ यांचे जावई असल्यामुळे होतं.

AJit pawar on Seat Sharing in Mahayuti
14 / 30

महायुतीत जागावाटप कसं होणार? अजित पवारांनी केलं स्पष्ट; मेरिटचा उल्लेख करत म्हणाले…

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024: राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल केव्हाही वाजू शकतं. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात यंदा खरी लढत होणार आहे. जागा वाटप आणि उमेदवारीसाठी चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जागा वाटप पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. उमेदवारांच्या इलेक्टिव्ह मेरिटवर विचार केला जाईल. तिन्ही पक्षांच्या मतदारांचा पाठिंबा महत्त्वाचा आहे.

karnatak anganwadi teacher gr on yrdu language
15 / 30

अंगणवाडीत नोकरीसाठी उर्दूची सक्ती; जीआरवर भाजपाची आगपाखड; कर्नाटक सरकारचा निर्णय चर्चेत!

कर्नाटक सरकारने अंगणवाडी शिक्षक भरतीसाठी उर्दू भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यावर भाजपने तीव्र आक्षेप घेतला आहे. भाजपाने हा निर्णय मुस्लीम समुदायाचं लांगुलचालन असल्याचा आरोप केला आहे. चिकमंगळुरू व मुदीगरे जिल्ह्यांमध्ये उर्दू भाषेची अट लागू करण्यात आली आहे. शिक्षण विभागाने या निर्णयाचे समर्थन करताना अल्पसंख्याक समुदायाच्या भाषेची अट आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli's determination I will not bow down to these people
16 / 30

“मी या लोकांसमोर झुकणार नाही”, अरबाज घराबाहेर पडल्यानंतर निक्कीचा निर्धार, म्हणाली…

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा ६ ऑक्टोबरला होणार आहे. यंदा १०० दिवसांऐवजी ७० दिवसांचा खेळ असणार आहे. अशातच निक्की तांबोळीने निर्धार व्यक्त केला आहे की ती बी टीमसमोर झुकणार नाही. यावरून नेटकऱ्यांनी निक्कीचं कौतुक केलं आहे.

CIDCO Lottery 2024 Dates in Marathi
17 / 30

सिडको लॉटरीसाठी कसा करावा ऑनलाइन अर्ज? आवश्यक कागदपत्रं अन् पात्रता काय? वाचा एका क्लिकवर

CIDCO Lottery 2024 Dates: मुंबईला लागून असलेल्या नवी मुंबईत वेगाने होणारा विकास पाहता, तिथे घर खरेदी करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशाच अनेकांना नवी मुंबईत पडवडणारी घरं खरेदी करता यावी यासाठी सिडकोकडूनही नवी सोडत जाहीर होण्याची शक्यता आहे. या लॉटरीअंतर्गत सिडकोची तब्बल ४० हजार घरे विकली जाणार आहे, दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर ही लॉटरी प्रक्रिया राबवली जाणार आहे. सिडकोच्या या ४० हजार घरांचे काम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांनी वर्तवली आहे.

Maruti Suzuki WagonR Waltz Limited Edition launched in India at this price know Features & Specs
18 / 30

५ लाखांपर्यंत खरेदी करा Maruti Suzukiची ‘ही’ फॅमिली कार; स्पोर्टी लूकसह मिळणार ‘हे’ फिचर्स

ऑटो 21 hr ago

देशातली सगळ्यात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने त्यांची प्रसिद्ध हॅचबॅक कार वॅगनारची नवीन लिमिटेड एडिशन वॉल्टज लॉन्च केली आहे. या नव्या कोऱ्या WagonR Waltz मध्ये काही अपडेट्स दिले गेले आहेत, जे या कारला बाकीच्या मॉडेल्सपेक्षा हटके बनवतात.

arbaz patel apologized about shivaji maharaj issue
19 / 30

“धर्माच्या बाबतीत मी…”, शिवाजी महाराजांचा जयजयकार न केल्याप्रकरणी अरबाज पटेलचे वक्तव्य

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात अरबाज पटेल पहिल्या आठवड्यातील कृतीमुळे एलिमिनेट झाला. पुरुषोत्तमदादा पाटील घराबाहेर पडताना शिवाजी महाराजांचा जयजयकार करत होते, तेव्हा अरबाज शांत उभा होता, ज्यामुळे प्रेक्षक नाराज झाले. अरबाजने याबद्दल माफी मागितली आहे आणि त्याने स्पष्ट केले की त्याचा हेतू चुकीचा नव्हता.

Bigg Boss Marathi Season 5 Arbaz Patel First time talk about his wedding
20 / 30

Bigg Boss Marathi : लग्नाबद्दल विचारताच अरबाज पटेल लाजला अन् म्हणाला, “आता तर…”

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा नववा आठवडा सुरू झाला आहे, पण प्रेक्षकांमध्ये नाराजी आहे कारण हे पर्व १०० दिवसांचं नसून ७० दिवसांचं असणार आहे. गेल्या शनिवारी संग्राम चौगुले वैद्यकीय कारणास्तव बाहेर गेला आणि रविवारी अरबाज पटेल एलिमिनेट झाला. ‘बिग बॉस’च्या घराबाहेर आल्यापासून अरबाज खूप चर्चेत आहे. नुकतंच त्यानं लग्नाबद्दल पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

Navra Maza Navsacha 2 Box Office Collection Day 4
21 / 30

‘नवरा माझा नवसाचा २’च्या कमाईत चौथ्या दिवशी मोठी घट, एकूण कलेक्शन १० कोटींपेक्षा कमी

'नवरा माझा नवसाचा २' हा १९ वर्षांपूर्वीच्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा सिक्वेल २० सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर आणि स्वप्नील जोशी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्या तीन दिवसांत चांगली कमाई करणाऱ्या या चित्रपटाने चौथ्या दिवशी १.२० कोटी रुपये कमावले. चार दिवसांत एकूण कलेक्शन ९.०४ कोटी रुपये झाले आहे.

Siddhivinayak Temple
22 / 30

प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादात उंदरांची पिल्ले? VIDEO व्हायरल

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादात उंदरांची पिल्ले सापडल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मंदिर प्रशासनाने हा दावा फेटाळून लावला आहे. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी प्रसाद तयार करण्याची जागा स्वच्छ असल्याचे सांगितले. त्यांनी व्हिडिओ सिद्धिविनायक मंदिराचा नसल्याचे स्पष्ट केले आहे. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

Bigg Boss Marathi Season 5 Arbaz Patel Talk About Suraj Chavan
23 / 30

“मी ही सूरजसारखा तळागाळातून आलोय”, अरबाज पटेलचं वक्तव्य, म्हणाला, “त्याच्याकडे गेम नाहीये”

मनोरंजन September 24, 2024

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वातून बाहेर आल्यापासून अरबाज पटेल चर्चेत आहे. विविध एंटरटेनमेंट चॅनेलशी संवाद साधताना तो दिसत आहे. याच वेळी त्याने सूरज चव्हाणविषयी वक्तव्य केली. अरबाजच्या मते, टॉप-२ सदस्य निक्की आणि सूरज आहेत. सूरजला बाहेर खूप प्रेम मिळतंय, पण त्याच्याकडे गेम नाहीये. तसेच, निक्कीबरोबरच्या नात्याबद्दलही अरबाजने स्पष्ट केलं.

Kitchen jugaad tips for remove oil stains from kadhai or any utensils try this hack
24 / 30

Kitchen Jugaad: कढईत एकदा व्हिनेगर टाकून पाहाच; या उपायाने होईल मोठा फायदा

अनेकदा आपण किचनमध्ये नवनवीन पदार्थ ट्राय करत असतो. काही पदार्थांमध्ये जास्त तेल वापरावं लागतं म्हणून लोक सर्रास तेल वापरतात किंवा सतत एकाच भांड्यात मुख्यत: कढईत वारंवार विविध पदार्थ ट्राय करतात, त्यामुळे भांड्याला तेलाचे चिकट डाग तसेच राहतात आणि कितीही स्वच्छ केले तरी ते काही केल्या जात नाहीत. पण, अशा परिस्थितीत खरंतर तुम्ही घरच्याघरी अगदी सोप्या पद्धतीने काही टीप्स फॉलो करून आणि अधिक मेहनत न घेता भांड्यांवरील तेलाचे चिकट डाग कायमचे नाहीसे करू शकता.

Akshay Shinde Encounter Badlapur Sexual Assault Case Update in Marathi
25 / 30

मुंब्रा बायपासवर असा घडला अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर, वाचा चकमकीचा घटनाक्रम

बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांच्या बंदूक हिसकावून गोळीबार केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे ठार झाला. विरोधी पक्षनेत्यांनी हा एन्काऊंटर हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप केला आहे. हा एन्काऊंटर कसा घडला याचा घटनाक्रम वाचा.

Budh gochar 2024 Libra will bring joy and happiness
26 / 30

आकस्मिक धनलाभ होणार; तूळ राशीतील प्रवेशाने ‘या’ तीन राशीच्या आयुष्यात येणार आनंदी आनंद

ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह ऑक्टोबरच्या सुरूवातीला कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे, ज्याचा प्रभाव काही राशींवर विशेष लाभदायी ठरेल. मेष राशीच्या व्यक्तींना मानसन्मान, धनलाभ, आणि नोकरीत प्रगती होईल. मिथुन राशीच्या व्यक्तींना मनोकामना पूर्ण होतील आणि आरोग्य उत्तम राहील. तूळ राशीच्या व्यक्तींना आर्थिक स्थिती सुधारेल, कर्ज फेडण्यास मदत होईल, आणि मानसिक तणाव कमी होईल.

Sensex Today crossed 85000 mark in bse nifty 50 reached over 25000
27 / 30

Sensex Today: सेन्सेक्स उसळला! ८५ हजारांचा विक्रमी टप्पा पार, निफ्टीनंही गाठला उच्चांक!

मुंबई शेअर बाजारात मंगळवारी सकाळी गुंतवणूकदारांमध्ये उत्साह दिसून आला. सेन्सेक्सने पहिल्यांदाच ८५ हजारांचा टप्पा ओलांडत ८५,०४३.४४ अंकांपर्यंत उसळी घेतली, ज्यामुळे गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा फायदा झाला. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरांमध्ये ५० पॉइंटने घट केल्याचा परिणाम बाजारावर दिसला. निफ्टी५०नेही विक्रमी कामगिरी करत २५,९७८.९० अंकांची नोंद केली.

Aishwarya Rai Bachchan was spotted seemingly wearing her wedding ring at Paris fashion week During Divorce Rumours
28 / 30

Video: घटस्फोटाच्या चर्चांना ऐश्वर्या राय-बच्चनने ‘असं’ दिलं उत्तर, पाहा व्हिडीओ

बॉलीवूड September 24, 2024

ऐश्वर्या राय-बच्चन तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. ती सध्या लेकीबरोबर विविध कार्यक्रमांमध्ये दिसत आहे. अलीकडेच दुबईत SIIMA 2024 पुरस्कार सोहळ्यात ती आराध्याबरोबर पाहायला मिळाली. त्यानंतर आता पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्या लाडक्या लेकीबरोबर दिसली. याच वेळी ऐश्वर्याने आपल्या कृतीतून घटस्फोटाच्या चर्चांना उत्तर दिलं.

Arbaz Patel girlfriend Leeza Bindra post about police report
29 / 30

अरबाज पटेलच्या गर्लफ्रेंडची पोलीस तक्रार करण्याबद्दल पोस्ट, रोख कुणाकडे?

बिग बॉस मराठी ५ मधून बाहेर पडलेला स्पर्धक अरबाज पटेल चर्चेत आहे. त्याने लीझा बिंद्राला गर्लफ्रेंड म्हटलं होतं, पण घरात निक्की तांबोळीशी जवळीक वाढली. लीझाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून रिलेशनशिपची कबुली दिली होती. अरबाजने मात्र याबद्दल काहीच माहीत नसल्याचं म्हटलं आहे. लीझाने सोशल मीडियावर पोलीस तक्रारीचा उल्लेख करत, तो चुकीचा माणूस नाही, असं म्हटलंय.

What Amol Kolhe Said?
30 / 30

“एन्काऊंटरने न्याय मिळाला असं…”, अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर खासदार अमोल कोल्हेंची पोस्ट

बदलापूर येथील शाळेतील दोन विद्यार्थिनींवर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा सोमवारी मुंब्रा बाह्यवळण मार्ग येथे पोलीस चकमकीत मृत्यू झाला. या घटनेनंतर नागरिकांनी बदलापूर बंदची हाक दिली होती. अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक हिसकावून गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ त्याला ठार केले. या प्रकरणी खासदार अमोल कोल्हे यांनी न्यायालयाच्या देखरेखीखाली सखोल चौकशीची मागणी केली आहे.