‘बिग बॉस मराठी’ फेम सई लोकूर आणि मेघा धाडेची धमाल-मस्ती, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…
टेलिव्हिजनवरील वादग्रस्त कार्यक्रम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'बिग बॉस'मध्ये अनेक नाती तयार होतात. मग ते बहीण-भावाचं असो, मित्र-मैत्रिणीचं असो किंवा गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असो. 'बिग बॉस'मध्ये ही नाती नेहमी तयार होताना पाहायला मिळतात. पण 'बिग बॉस'नंतर ही नाती कायम टिकतात असं १०० टक्के नाही. अनेक नाती मोडल्याचं देखील पाहायला मिळालं आहे. पण काही नाती ही आयुष्यभरासाठी जोडली जातात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सई लोकूर आणि मेघा धाडे यांची मैत्री. सध्या दोघी धमाल-मस्ती करताना दिसत आहेत.