“विजेता आधीच ठरलेला असतो”, ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वातील स्पर्धकाचे वक्तव्य
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा सहावा आठवडा नॉमिनेशन टास्कने सुरू झाला. घन:श्याम दरवडे, आर्या जाधव, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, निक्की तांबोळी, अरबाज पटेल आणि अभिजीत सावंत नॉमिनेट झाले आहेत. अशातच त्यागराज खांडिलकरने 'बिग बॉस मराठी' स्क्रिप्टेड असल्याचे मान्य केले आहे. त्याच्या मते, विजेता आधीच ठरलेला असतो आणि शोमध्ये सर्व काही ठरवून केले जाते, असे त्यागराजने स्पष्ट केले. त्यागराज 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या पर्वात झळकला होता.