“एवढी २० वर्ष तुम्ही जे प्रेम दिलंय ते आताही द्या”, अभिजीत सावंतच्या सासूबाईचं वक्तव्य
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा ६ ऑक्टोबरला होणार आहे. अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर आणि वर्षा उसगांवकर यांच्यातील एक विजेता ठरणार आहे. अभिजीत सावंतच्या आई आणि सासूबाईने प्रेक्षकांना मत देण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर त्यांच्या व्हिडीओ व्हायरल झाला आहे.