“कुठेतरी फेक वाटतंय”, निक्कीबरोबर असलेल्या रिलेशनशिपवर अरबाज पटेलच्या वडिलांचं भाष्य
'बिग बॉस मराठी'चं पाचवं पर्व सुरू झाल्यापासून एक जोडी कायम चर्चेत आहे ती म्हणजे निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल. या पर्वाच्या पहिल्या दिवसापासून दोघं एकत्र पाहायला मिळत आहेत. दोघांमध्ये सतत वाद होतं असले तरी काही वेळानंतर दोघं पुन्हा एकत्र झाल्याचं दिसत आहे. गेल्या आठवड्यात निक्की व अरबाजमध्ये कडाक्याची भांडणं झाली. तरी देखील या आठवड्यात दोघं एकत्र आले. निक्कीबरोबरच्या या रिलेशनशिपवर आता अरबाजच्या वडिलांनी भाष्य करत आपलं परखड मत मांडलं आहे.