“सुरजने सहानुभूतीच्या जीवावर बिग बॉस जिंकलं नाही पाहिजे”, मराठी अभिनेत्याचं वक्तव्य
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात स्पर्धकांनी पहिल्या दिवसांपासूनच धिंगाणा घातला आहे. जान्हवी किल्लेकर, निक्की तांबोळी, अरबाज असे अनेक स्पर्धक सतत ट्रोल होत आहेत. मात्र, सुरज चव्हाणला महाराष्ट्राकडून भरभरून प्रेम मिळत आहे. अभिनेता कपिला होनरावने सुरजचं कौतुक करताना त्याला अजून सुधारण्याची गरज असल्याचं सांगितलं. सुरजने सहानुभूतीवर नव्हे, तर स्वतःच्या ताकदीवर शो जिंकावा, असं कपिल म्हणाला.