“कुरूप वेडा ठरवू नका”, सूरज जिंकला म्हणून टीका करणाऱ्यांना किरण मानेंचं जबरदस्त उत्तर
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणचं सध्या सर्वत्र कौतुक होतं आहे. मराठी कलाकारांसह राजकारणातील दिग्गज मंडळी सूरजचं कौतुक करताना दिसत आहेत. पण दुसऱ्याबाजूला अनेकजण नाराज आहेत. सहानुभूतीमुळे सूरज जिंकला असं म्हणत टीका करत आहेत. याच टीकाकारांना अभिनेते आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) पदाधिकारी किरण माने यांनी आपल्या पोस्टमधून जबरदस्त उत्तर दिलं आहे.