“तुम्ही घर देतायत म्हणून…”, सूरजला सतत टोकण्यावरून निक्की तांबोळी-अंकितामध्ये भांडण
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा अंतिम आठवडा सुरू होणार आहे. अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, पंढरीनाथ कांबळे, धनंजय पोवार, वर्षा उसगांवकर आणि जान्हवी किल्लेकर यांपैकी एक विजेता ठरणार आहे. रितेश देशमुखच्या अनुपस्थितीत 'भाऊचा धक्का' पार पडत आहे. शनिवारी काही खास पाहुण्यांनी घरात येऊन सदस्यांचं कौतुक आणि टीका केली. अशातच सूरजवरून निक्की-अंकिता आणि अभिजीत-पंढरीनाथमध्ये वाद झाल्याचं समोर आलं आहे.