“वैभव आतापर्यंत ‘बिग बॉस’मध्ये बॉडीमुळे आहे”, निक्की तांबोळीचं विधान, अरबाजला म्हणाली…
Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. स्पर्धकांनी हे पर्व चांगलंच गाजवलं आहे. निक्की तांबोळी असो, अभिजीत सावंत असो किंवा सूरज चव्हाण प्रत्येक स्पर्धक आता घराघरात पोहोचले आहेत. काही स्पर्धकांनी आपल्या खेळीने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. अशातच निक्की व अरबाजचा एक प्रोमो सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये दोघं वैभवबद्दल बोलताना दिसत आहेत.