घराबाहेर जाणाऱ्या सदस्याचं नाव ऐकताच निक्कीचा फुटला टाहो, ‘हे’ सदस्य झाले सेफ, पाहा प्रोमो
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात शनिवारी 'भाऊच्या धक्क्या'वर 'महाराष्ट्राचा धक्का' पाहायला मिळाला. रितेश देशमुखच्या अनुपस्थितीत डॉ. निलेश साबळेची एन्ट्री झाली. पत्रकार परिषदेत सदस्यांनी सणसणीत प्रश्नांची उत्तरे दिली. संग्राम चौगुले वैद्यकीय कारणास्तव बाहेर पडला. आज एलिमिनेशन प्रक्रिया पार पडणार आहे. घराबाहेर जाणाऱ्या सदस्याचं नाव ऐकताच निक्की तांबोळी ढसाढसा रडताना दिसत आहे. नुकताच याचा प्रोमो समोर आला आहे.