Video: सूरज चव्हाणला येतेय गावची आठवण, म्हणाला, “मी साधा आणि सनकी आहे, पण इथे…”
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा सातवा आठवडा सुरू असून कॅप्टन्सीचा टास्क चालू आहे. अरबाज पटेल, धनंजय पोवार, वैभव चव्हाण, सूरज चव्हाण आणि वर्षा उसगांवकर हे कॅप्टन्सीसाठी उमेदवार आहेत. जान्हवी किल्लेकर आणि वैभवने 'जादुई हिरा' मिळवून अरबाज आणि सूरजला कॅप्टन्सीच्या टास्कमधून बाद केलं. आता धनंजय, वैभव आणि वर्षा यांच्यातील कोण कॅप्टन होणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. दरम्यान, सूरजला गावची आठवण येत आहे. गावाच्या आठवणीत रमत त्याने अंकिता व पंढरीनाथबरोबर गप्पा मारल्या.