Bigg Boss Marathi : सूरज चव्हाणने सांगितला लग्नाचा प्लॅन; निक्की, अभिजीतला म्हणाला…
२८ जुलैपासून सुरू झालेलं 'बिग बॉस मराठी'चं पाचवं पर्व ७० दिवसांत संपत आहे. ६ ऑक्टोबरला महाअंतिम सोहळा होणार आहे. अंतिम आठवड्यात तिकीट-टू-फिनाले टास्कमध्ये जिंकून निक्की तांबोळी पहिली फायनलिस्ट ठरली आहे. मिडवीक एलिमिनेशनमध्ये अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार आणि वर्षा उसगांवकर यांच्यापैकी एक जण बाहेर जाणार आहे. अशातच सूरजच्या लग्नाच्या प्लॅनिंगचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.