अरबाज पटेलबरोबरच्या मैत्रीबद्दल स्पष्टच बोलला वैभव चव्हाण; म्हणाला, “माझा स्वभाव मला नडला”
'बिग बॉस मराठी' सीझन ५ मध्ये रविवारी (१५ सप्टेंबर) धमाल-मस्ती झाली. रितेश देशमुखने सदस्यांना त्यांच्या कुटुंबियांचे व्हिडीओ दाखवून भावुक केले. नॉमिनेशनमध्ये निक्की, अंकिता सेफ झाल्या आणि वैभव चव्हाण एलिमिनेट झाला. अरबाजने वैभवला अजून एक संधी देण्याची मागणी केली. पण ती मान्य झाली नाही. वैभवने घराबाहेर आल्यावर अरबाजबरोबरच्या मैत्रीबद्दल मत मांडले.