“आपला पॅडी का रडला?” याचं उत्तर देत विशाखा सुभेदारने सांगितला पंढरीनाथ कांबळेचा किस्सा
'बिग बॉस मराठी'मध्ये काही दिवसांपासून काही सदस्यांना उकडलेलं अन्न खाण्याची शिक्षा देण्यात आली होती. ही शिक्षा देण्यामागचं कारण 'बिग बॉस'ने स्पष्ट केलं. "आज महाराष्ट्रात एक वेळच्या अन्नासाठी देखील चूल पेटणं शक्य होतं नाही. या परिस्थितीची झलक मिळावी म्हणून आपण केवळ उकडलेलं अन्न खा," असं 'बिग बॉस'कडून सांगण्यात आलं होतं. त्यानंतर 'बिग बॉस'चे हे शब्द ऐकून पंढरीनाथ कांबळेचे अश्रू अनावर झाले. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री विशाखा सुभेदारने नुकतीच पोस्ट शेअर केली आहे.