विशाखा सुभेदारने पंढरीनाथचं केलं कौतुक, म्हणाली, “अंदाजे तुझं वय वर्षे ५२ असावं, पण…”
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात नुकत्याच झालेल्या टास्कमध्ये पंढरीनाथ कांबळेचा जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. कॅप्टन्सीसाठी झालेल्या टास्कमध्ये पंढरीनाथने अरबाज-वैभवला चांगलंच पळवलं. तसंच ‘जादुई हिरा’च्या टास्कमध्ये निक्कीला पंढरीनाथने भन्नाट उत्तर दिली. एकंदरीत तो निक्कीवर शाब्दिक वार करताना दिसला. त्याचा याच खेळाचं कौतुक अभिनेता सिद्धार्थ जाधवनंतर अभिनेत्री विशाखा सुभेदारने केलं आहे.