१५ वर्षांनंतर चिन्मय मांडलेकर ‘स्टार प्रवाह’साठी करणार काम, पोस्ट करत म्हणाला…
अभिनेता, लेखक, दिग्दर्शक चिन्मय मांडलेकरचं 'गालिब' नाटक सध्या रंगभूमीवर जोरदार सुरू आहे. या नाटकात गौतमी देशपांडे व विराजस कुलकर्णी प्रमुख भूमिकेत आहेत. अशातच चिन्मयने १५ वर्षांनंतर 'स्टार प्रवाह'साठी काम करण्याची घोषणा केली आहे. 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत!' या नव्या मालिकेसाठी चिन्मय लेखन करणार आहे.